नाशिक

सिडकोत अपघातांचे वाढते प्रमाण

रुग्णवाहिका सुविधांचा अभाव चिंताजनक

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. काहीवेळा या अपघातांत जीव गमवावा लागल्याच्या घटनाही समोर येत आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साहात सिडको परिसरातील गणेश चौक – अंबड पोलीस स्टेशन रोडवर एका मजुराचा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मजूर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत 108 रुग्णवाहिकेची वाट न पाहता जवळच्या स्वामी समर्थ मोरवाडी दवाखान्यात धाव घेतली. सुरुवातीला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास दवाखान्याकडून नकार मिळाला; मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अखेर रुग्णवाहिका देण्यात आली. वेळेत उपचार मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला. सध्या त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेतून सिडको सारख्या मोठ्या व दाट लोकवस्तीच्या भागात वैद्यकीय सुविधा अपुर्‍या असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतंत्र रुग्णवाहिका व शववाहिका सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात मोठा अनर्थ टाळण्यासाठी अशा सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच 108 ला फोन केला होता. मात्र जखमीची अवस्था पाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरवाडी दवाखान्यात जाऊन रुग्णवाहिकेची मागणी केली. सुरुवातीला नकार मिळाला, पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचवता आला. मात्र, भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना उपचार मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी सिडको भागाकरिता स्वतंत्र रुग्णवाहिका व शववाहिका सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही महापालिकेकडे सातत्याने विनंती करत आहोत.
– योगेश कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते

 

Editorial Team

Recent Posts

नाशिक-पुणे महामार्गावर सात पिकअप वाहनांतून 16 बैलांची दाटीवाटीने वाहतूक

प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…

5 minutes ago

टाकळी रोडवर महिलेची पर्स हिसकावून चोरट्याचे पलायन

पोतदार शाळेमागील घटना; मोबाइलसह 20 हजारांचा ऐवज चोरीला सिडको : प्रतिनिधी टाकळी रोडवरील पोतदार शाळेच्या…

10 minutes ago

दमण-दादरा नगरहवेलीचे विदेशी मद्य जप्त

वाघेरा चौफुलीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई देवळाली कॅम्प : प्रतिनिधी दमण व दादरा नगरहवेली…

14 minutes ago

मैत्रिणीच्या घरी चावी वापरुन चोरी; चौघांना अटक

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या महिलेच्या पर्समधून घराची चावी चोरून, त्याच चावीच्या मदतीने…

21 minutes ago

फडणवीसांचाही होणार होता ’गेम’ : जरांगेंचा दावा

मुंबई / जालना : प्रतिनिधी कथित पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

1 hour ago

’समृद्धी’वरून मुंबईला निघताय? आधी ब्लॉकच्या वेळा पाहा!

♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध ♦ दिवसातून तीन वेळा एक तास…

1 hour ago