पोतदार शाळेमागील घटना; मोबाइलसह 20 हजारांचा ऐवज चोरीला
सिडको : प्रतिनिधी
टाकळी रोडवरील पोतदार शाळेच्या पाठीमागे मुक्ताई हॉस्पिटलजवळ दुचाकीवरून जाणार्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून चोरट्याने पलायन केल्याची घटना घडली. या पर्समध्ये मोबाइल फोन, दुचाकीची चावी, घराची चावी आणि इतर साहित्य, असा एकूण 20 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. दीपाली श्यामराव कुलथे (वय 39, रा. सिद्धेश्वरनगर, जेलरोड, नाशिकरोड) या दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या दाजींसोबत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी पोतदार शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर मुक्ताई हॉस्पिटलजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून अॅक्टिव्हा मोपेडवरून एक अनोळखी इसम आला. त्याने दुचाकीचा वेग कमी करून महिलेच्या हाताला अडकवलेली काळ्या रंगाची पर्स हिसकावून घेतली आणि पळ काढला.
चोरी झालेल्या पर्समध्ये मोटोरोला जी 57 पॉवर कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाइल फोन, एअरटेलचे सिम कार्ड, अॅक्टिव्हा दुचाकीची चावी, न्यायालयीन लॉकरची चावी, फ्लॅटची चावी आणि नाव लिहिलेले स्टीलचे की-चेन होते. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण किंमत 20 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Thief snatches woman’s purse on Takli Road and flees
1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…
उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…
तीन आठवड्यांत संख्या 109 वर नाशिक : प्रतिनिधी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून, ऑक्टोंबरच्या तीन…
शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबादसाठी सुरू असलेल्या विमानसेवेसाठी 78 ऐवजी 180 आसनी विमान…
प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…