मुंबई / जालना : प्रतिनिधी
कथित पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजकीय ’गेम’ करण्याचा डाव होता, असा नवा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जरांगेंनी पत्रकार परिषदेत या ऑडिओ क्लिपमागील राजकीय षडयंत्रावर भाष्य केले.
हा प्रकार म्हणजे शिवसेना पक्षावर केलेला घाव नसून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेले मोठे षडयंत्र होते. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास केवळ एकनाथ शिंदे यांचाच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही मोठा ’गेम’ होणार होता, अशी चर्चा असल्याचा दावा जरांगे यांनी केला. 500 कोटींच्या या व्यवहाराबाबत कदाचित फडणवीसांना कल्पना नसावी. मात्र, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास यात भाजपचेच नेते गुंतले होते, हे सिद्ध होईल आणि फडणवीस व शिंदे दोघेही अडकतील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
संजय राऊत यांचे अमित शहा यांना पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकृत पत्र पाठवून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या; आता आंदोलनंही विकत घेण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे.
Fadnavis was also going to be ‘outmaneuvered’: Jarange’s claim
शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबादसाठी सुरू असलेल्या विमानसेवेसाठी 78 ऐवजी 180 आसनी विमान…
प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…
पोतदार शाळेमागील घटना; मोबाइलसह 20 हजारांचा ऐवज चोरीला सिडको : प्रतिनिधी टाकळी रोडवरील पोतदार शाळेच्या…
वाघेरा चौफुलीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई देवळाली कॅम्प : प्रतिनिधी दमण व दादरा नगरहवेली…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या महिलेच्या पर्समधून घराची चावी चोरून, त्याच चावीच्या मदतीने…