नाशिक

चिन्ह नसल्याने अपक्षांची तर अनुक्रमांकाअभावी पक्षीय उमेदवारांची गोची

चिन्ह आणि अनुक्रमांक मिळण्यासाठी 26 तारखेची प्रतीक्षा; प्रचारासाठी मिळणार अवघे 5 दिवस

सिन्नर : प्रतिनिधी
माघारी झाल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. मात्र, हा प्रचार केवळ वातावरण निर्मिती ठरत असून, पक्षीय उमेदवारांना पक्षांचे चिन्ह असले तरी प्रचारपत्रकावर अनुक्रमांकांची जागा कोरी ठेवून अर्धवट प्रचार करावा लागत आहे. दुसरीकडे नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या 6 अशा एकूण 7 जागांवर अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. मात्र, चिन्ह आणि अनुक्रमांक नसल्यामुळे त्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. 26 तारखेला अनुक्रमांक आणि चिन्ह मिळाल्यावर अवघ्या 5 दिवसांत मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न अपक्ष उमेदवारांना पडला आहे.
सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा, युवानेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि माजी खासदार हेमंत गोडसे, तालुकाध्यक्ष योगेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय डोमाडे, दीपक खुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने पॅनल निर्मिती करत कंबर कसली आहे. या चौरंगी लढतीत पक्षीय उमेदवारांनी आपापल्या प्रचारपत्रकांवर पक्ष चिन्ह टाकून प्रचार सुरू ठेवला आहे. 21 नोव्हेंबर रोजी माघारी झाल्यानंतर लगेच पक्षाचे चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक कार्यक्रमात 26 तारखेला पक्षचिन्ह आणि अनुक्रमांक देणार असल्याने तोपर्यंत उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 26 तारखेला पक्ष चिन्ह आणि अनुक्रमांक मिळाल्यानंतर लगेच त्याच दिवशी प्रचारपत्रके मिळावीत, यासाठी उमेदवारांनी सर्व डिझाइन तयार करून ठेवली आहे. केवळ अनुक्रमांक टाकून तातडीने प्रचारपत्रके छापून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 30 तारखेला संध्याकाळी प्रचार संपणार असल्याने अनुक्रमांक आणि निशाणीसह प्रचार करण्यासाठी उमेदवारांना केवळ पाच दिवस मिळणार असल्याने मोठी धावपळ होणार आहे.

अपक्ष दारुवाले यांचा निशाणी टाकून प्रचार

प्रभाग क्रमांक 6 ब मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाले यांना नामदार कोकाटे यांनी उमेदवारी डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रभागातून त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या प्रभागात मुस्लिम समाजाची जवळपास 650 मते असल्याने ते नेटाने कामाला लागले आहेत. एवढेच नव्हे तर नामनिर्देशनपत्राच्या चिन्हांच्या प्रथम पसंतीक्रमात त्यांनी नारळ निशाणी टाकली आहे. हीच निशाणी आपल्याला नक्की मिळणार, या आत्मविश्वासाने त्यांनी प्रचारपत्रके छापून प्रचार सुरू केला आहे.

हे अपक्ष आहेत मैदानात

थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपातून बंडखोरी करत किशोर देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. याशिवाय, नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक 4 ब मधून देवानंद हरिभाऊ जाधव, प्रभाग क्रमांक 6 ब मधून मेहमूद इब्राहिम दारुवाले, सागर घनश्याम देशमुख, प्रभाग क्रमांक 10 ब मधून अक्षय अशोक चकोर, प्रभाग क्रमांक 13 अ मधून शरद हिरामण लोणारे आणि प्रभाग क्रमांक 7 ब मधून रोहिणी मदन जाधव हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, चिन्हच नसल्याने प्रचार नेमका कसा करायचा, असा प्रश्न या अपक्ष उमेदवारांना पडला आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago