नाशिक

रामेश्वर धरण ते चिंचवे कालवा वहनक्षमता वाढणार

देवळा तालुक्यातील पूर्व भागाचा सिंचनप्रश्न मार्गी लागणार

देवळा : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागाचा शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी चणकापूर उजव्या कालव्यांंतर्गत रामेश्वर धरण ते चिंचवे या 26 किलोमीटरपर्यंतच्या रुंदीकरण व अस्तरीकरण करून कालव्याची वहनक्षमता वाढविण्याच्या कामासाठी 65 कोटींचा निधी मंजूर होऊन या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, हे महत्त्वाकांक्षी काम पुढील एक वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या कालव्यासाठी एकूण 18 विमोचक ( गेट) बसविण्यात येणार असल्याने छोटे-मोठे पाझर तलाव भरून त्याचा लाभ शेतीला होणार आहे. रामेश्वर ते झाडी या चणकापूर उजवा वाढीव कालव्याची सध्याची वहनक्षमता 87 क्यूसेक इतकीच आहे, मात्र या नव्याने प्रस्तावित कामामुळे ती 265 क्यूसेक इतकी होणार आहे. तर झाडी येथील वहनक्षमता जी 13.80 क्यूसेक आहे, ती आता 108 क्यूसेक इतकी होणार आहे.
याअगोदर या वाढीव कालव्याला फक्त पूरपाण्याचीच मान्यता होती, परंतु आता नार-पार योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सदर कालवा हा आठमाही होऊन शेतीसिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे 11 हजार 500 हेक्टर क्षेत्र शाश्वत सिंचनाखाली येईल. शेतीपाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही त्याचा लाभ होणार असल्याने हे काम दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.
यानंतरच्या दुसर्‍या टप्प्यात चणकापूर ते रामेश्वर या उजव्या कालव्याच्या 38 किलोमीटरच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून याचीही वहनक्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे या कालव्याची वहनक्षमता 184 क्यूसेकवरून ती वाढवून आता 427 क्यूसेक करणे प्रस्तावित आहे. तर रामेश्वर धरण येथे टेलला पूर्वीची 88 क्यूसेक असलेली वहनक्षमता 260 होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते.

या गावांना होणार लाभ

नव्याने तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन यातून वाजगाव, भावडे, रामेश्वर, वडाळे, सुभाषनगर, कापशी, भिलवाड, गुंजाळनगर, वाखारी, दहिवड आदी गावांना त्याचा लाभ होणार आहे. याशिवाय, चिंचवे ते झाडी या पुढील साखळी क्र. 27 ते 36 या कामाचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच चणकापूर कालव्याच्या दक्षिण भागाकडील उंचीवर असलेल्या व मूळ अस्तित्वातील कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत असलेल्या गावांसाठी रामेश्वर धरण व शेरी येथील उपसा जलसिंचन योजनेचेही काम प्रस्तावित आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

24 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

24 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago