राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

भारत टी-20 मध्ये तिसर्‍यांदा विश्वविजेता, न्यूझीलंडला हरवले

अहमदाबाद :
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला. या विजयासह भारत सलग दुसर्‍यांदा टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि किताब डिफेंड करणारा पहिला संघ ठरला. इतकंच नाही तर यजमान देशाने प्रथमच टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला. विजेतेपदाची ट्रॉफी हातात येताच कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण संघाने मैदानावर जल्लोेष केला.
अंतिम सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 20 षटकांत पाच बाद 255 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम 19 षटकांत 159 धावांत गारद झाली. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धावांच्या फरकाने मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची तुफानी भागीदारी केली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावा करत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले, त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र, संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले
होते.

जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडला गुंडाळले

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर किवी संघाची घसरण सुरू झाली.

India wins T20 World Cup for the third time, defeats New Zealand

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago