मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचा आज दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी वाढदिवस. त्यानिमित्त…
शिक्षणसंस्था म्हणजे केवळ पदवी देणारी व्यवस्था नव्हे, तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे महत्त्वाचे केंद्र असते. बदलत्या काळात या जबाबदारीचे स्वरूपही बदलले आहे. आज विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्यसंपन्न बनविणे आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हीदेखील शिक्षणसंस्थेची जबाबदारी बनली आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने याच बदलत्या वास्तवाचे भान ठेवत शिक्षणाबरोबर रोजगारनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या पुढाकारातून आणि प्रोत्साहनातून रोजगाराभिमुखतेचा हा विचार एका व्यापक चळवळीत रूपांतरीत होत आहे.
डॉक्टर, अभियंते, शिक्षक, वकील, उद्योजक, कलावंत अशा विविध क्षेत्रांत मविप्रच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास आणि त्यातून समाजाची प्रगती हे कर्मवीरांचे स्वप्न होते. मात्र, काळानुसार रोजगाराचे स्वरूप बदलले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्वयंचलित यंत्रणांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक नोकर्यांच्या संधी मर्यादित होऊ लागल्या. दुसरीकडे दरवर्षी मोठ्या संख्येने पदवीधर रोजगाराच्या बाजारपेठेत दाखल होत होते. पदवी असूनही नोकरी न मिळणे, उद्योगांना अपेक्षित कौशल्यांचा अभाव आणि वाढती बेरोजगारी ही आव्हाने गंभीर बनली.
या परिस्थितीत केवळ शिक्षण देऊन संस्थेची जबाबदारी संपत नाही, याची जाणीव मविप्रच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने ठेवली. संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे यांचे 2025-26 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त या उपक्रमाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटरची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्यापकता. आणि मविप्रच्या माध्यमातून आजवर सुमारे सव्वाशे नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला असून, सहा हजारांहून अधिक पदवीधरांना रोजगार मेळाव्यांच्या ठिकाणीच ऑफर लेटर देण्यात आले आहेत. हा आकडा केवळ नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवत नाही, तर शिक्षण संस्थेने रोजगाराच्या प्रश्नात थेट पुढाकार घेतल्यास किती मोठा बदल घडविता येतो, हेही अधोरेखित करतो.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगार या तिन्ही गोष्टी एकाच सूत्रात बांधण्याचा ‘मविप्र’चा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. आद्य कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज बदलत्या काळाची गरज ओळखून त्याच संस्थेने शिक्षणातून रोजगार आणि रोजगारातून स्वावलंबनाची दारे खुली करण्याचा संकल्प केला आहे. अॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आकार घेत असलेली ही रोजगाराभिमुख वाटचाल ‘मविप्र’च्या कार्याला नवी दिशा देणारी आहे. ‘मविप्र’ची ही नवी ओळख त्याच विचाराचे
प्रतिबिंब आहे.
Initiative is important
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो. शाळा, महाविद्यालय, शिकवणी, गृहपाठ आणि परीक्षांची तयारी…
कॉलेज म्हटले की, वर्गातील लेक्चर्स, परीक्षा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्यासोबतच कधी तरी केलेला कॉलेज बंक!…
सिन्नर : प्रतिनिधी येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब…
अल्पवयीन मुलीचाही विनयभंग; गुन्हा दाखल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी पैसे परत देण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर…
भोंदूबाबा अरुण पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल देवळाली कॅम्प : प्रतिनिधी बनावट साठेखत, अधिकारपत्र आणि गोड बोलून…
चालकावर गुन्हा दाखल; पिंपळगाव बसवंत पोलिसांत तक्रार निफाड : तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न…