नाशिक

माळेगाव एमआयडीसीत 60 लाखांच्या पावडरवर डल्ला; 13 जन रडारवर

सिन्नर : प्रतिनिधी
येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. 60 लाख 27 हजार रुपये किमतीच्या या पावडरच्या 121 बॅगांचा अपहार झाल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापनाने केली आहे. याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी आणि माथाडी कामगार अशा 13 जणांविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनरल मिल्स प्रा. लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर रावसाहेब रामदास माकोणे (वय 41, रा. चेहेडी पंपिंग) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माळेगाव एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए-82 येथील सिटीझन इंटरनॅशनल कंपनीत 29 ऑगस्ट ते 4 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. प्रत्येकी 25 किलो वजनाच्या 121 बॅगा, असे एकूण तीन हजार 25 किलो व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट पावडर गायब झाल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे.
याप्रकरणी ऑपरेटर अनंत फकिरा सानप (रा. दोडी बु.), साफसफाई कर्मचारी सुदाम सूर्यभान गोराडे (रा. मनेगाव), माथाडी कामगार प्रेम सुनील ससाणे, दीपक भीमराव गवई, विठ्ठल उद्धव ढाकणे, परशुराम निजाबा गुट्टे, विकास गंगाधर राम, राहुल जयराम भारती, राहुल अशोक ससाणे, ज्ञानेश्वर सूर्यभान गोंधळे, रामभाऊ गंगाधर गुट्टेे (सर्व रा. ससाणे मळा, माळेगाव), संदीप बाळू पवार (रा. गवळीवाडा, सिन्नर) आणि किरण राजाराम बिन्नर (रा. हिवरे, ता. सिन्नर) अशा 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एका व्यक्तीने माल चोरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मुसळगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Rs 60 lakh worth of powder stolen in Malegaon MIDC; 13 individuals under the scanner

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कॉलेज बंक चहा, मिसळ अन् मनमोकळे संवाद!

कॉलेज म्हटले की, वर्गातील लेक्चर्स, परीक्षा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्यासोबतच कधी तरी केलेला कॉलेज बंक!…

6 minutes ago

बदनामीची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार

अल्पवयीन मुलीचाही विनयभंग; गुन्हा दाखल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी पैसे परत देण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर…

25 minutes ago

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

भोंदूबाबा अरुण पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल देवळाली कॅम्प : प्रतिनिधी बनावट साठेखत, अधिकारपत्र आणि गोड बोलून…

36 minutes ago

बाराशे क्रेट्स पेरूंसह 13 लाखांचा ट्रक गायब

चालकावर गुन्हा दाखल; पिंपळगाव बसवंत पोलिसांत तक्रार निफाड : तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न…

39 minutes ago

कृतघ्न मुलांना धडा शिकवायलाच हवा!

आपल्या बाळाच्या पालनपोषणात, शिक्षणात, आवडीनिवडी जपण्यात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आई-वडील आयुष्यभर राबत असतात.…

50 minutes ago

पुराना रिश्ता नया दौर

भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष कोणता असेल, तर तो पंजाबमधील शिरोमणी अकाली दल. या पक्षाशी असलेली…

55 minutes ago