नाशिक क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
वडाळागाव : प्रतिनिधी
रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास अटक करून नाशिक शहरातील घरफोडी व वाहन चोरीचे एकूण 24 गुन्हे उघडकीस आणण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार नाशिक शहरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सादिक अली ऊर्फ जाफरी युसुफ शेख (रा. आंबेवली, कल्याण) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपीने नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 22 गुन्हे व दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण 26,24,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 च्या संयुक्त पथकाने केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
Inn thief arrested, 24 crimes revealed
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…