नाशिक

सराईत चोरट्यास अटक, 24 गुन्हे उघड

नाशिक क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

वडाळागाव : प्रतिनिधी
रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास अटक करून नाशिक शहरातील घरफोडी व वाहन चोरीचे एकूण 24 गुन्हे उघडकीस आणण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार नाशिक शहरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सादिक अली ऊर्फ जाफरी युसुफ शेख (रा. आंबेवली, कल्याण) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपीने नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 22 गुन्हे व दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण 26,24,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 च्या संयुक्त पथकाने केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Inn thief arrested, 24 crimes revealed

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago