नवी दिल्ली :
मागील काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण देशात घमासान सुरू आहे. कुठल्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता असतानाच आता या युद्धाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इराणच्या हद्दीतून अमेरिकेचे लष्कर (सैन्य) माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार ओमान आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांसमोर एक ‘शांतता मसुदा’ ठेवण्यात आला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव थांबवून चर्चेच्या टेबलवर यावे, यासाठी जागतिक पातळीवरून प्रचंड दबाव आणला जात आहे. शांतता मसुद्यात प्रामुख्याने 3 टप्प्यांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. मात्र, वरवर शांततेचा वाटणारा हा शांतता मसुदा प्रत्यक्षात अंमलात आणणे दोन्ही देशांसाठी अग्नीपरीक्षेपेक्षा कमी नसणार आहे.
साठ दिवसांच्या युद्धविरामादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर आणि एकमेकांच्या लष्करी तळांवर सुरू असलेले थेट हल्ले तातडीने थांबवायचे आहेत. या 60 दिवसांच्या कालावधीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी शांतता करारासाठी एकत्र बसतील.
इराणने आंतरराष्ट्रीय खनिज तेल व्यापाराची जीवनवाहिनी असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधील नाकेबंदी हटवावी. त्या बदल्यात अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती घातलेली आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी पूर्णपणे हटवायची आहे.
अमेरिकेच्या दबावामुळे विविध आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये गोठवून ठेवलेला इराणचा अब्जावधी डॉलर्सचा निधी टप्प्याटप्प्याने मोकळा केला जाईल आणि इराणवरील जाचक आर्थिक निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.
Is it possible for US troops to withdraw from Iran?
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…