नाशिक

खरातने पीडितेला गर्भपाताची औषधे दिल्याचे उघड

नाशिक :
अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून तीन ते चार डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधल्या बड्या डॉक्टरची चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली.
यावेळी अशोक खरातने याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणार्‍या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या महिलेला ओकस कार्यालयामध्ये अशोक खरातने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या.
पूजाविधीच्या बहाण्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केले. महिला प्रेग्नंट राहिल्याने अशोक खरातने गर्भपातच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरातच्या मोबाईलमधून डेटा जप्त करण्यात आला असून, महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अशोक खरातने चार वर्षांत सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये अशोक खरातने मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावे आहेत. अशोक खरातने रोखीनेच बहुतांश पेमेंट केल्याचे उघड झाले आहे. नाशिकमधील बंगला आणि ऑफिसचे काम केलेल्या कामगारांना सुमारे 25 लाख रोख दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

It is revealed that Kharat gave abortion pills to the victim.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

35 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

56 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

60 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago