नाशिक

आडगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

16 दुचाकींसह सराईत चोरट्याला बेड्या

पंचवटी : प्रतिनिधी
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच आडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. एका सराईत दुचाकी चोरट्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 16 महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हा संशयित मध्य प्रदेशापर्यंत चोरीच्या गाड्यांची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अमृतधाम परिसरातील आयकॉन प्राइड इमारतीच्या पार्किंगमधून 13 फेब्रुवारी रोजी ओम राजेंद्र देवरे यांची युनिकॉर्न मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हेशोध पथकाचे हवालदार दादासाहेब वाघ आणि इम्रान शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
पोलिसी खाक्या दाखवताच राजेंद्रने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने नाशिक शहरासह ग्रामीण भागात आणि चक्क मध्य प्रदेशातही बनावट माहिती देऊन गाड्या विकल्याचे सांगितले. सहायक निरीक्षक बोंडे आणि उपनिरीक्षक पंचमुख यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध घेत पल्सर (4), युनिकॉर्न (2), स्प्लेंडर (3), प्लॅटिना (2), शाईन, करिश्मा, पॅशन-प्रो आणि एचएफ डिलक्स ही वाहने हस्तगत केली. जप्त केलेल्या अनेक गाड्यांचे चेसी आणि इंजिन नंबर चोरट्याने खोडलेले होत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, आणि साहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बोंडे, पोलीस उपनिरीक्षक पंचमुख, हवालदार वाघ, शेख, पोलीस अंमलदार मोरे व शक्ती पेंढारकर यांच्या पथकाने केली.

अंधाराचा फायदा घेऊन पळण्याचा प्रयत्न

संशयित आरोपी राजेंद्र हिरामण वाघमारे (वय 32, रा. ओझर) चोरीची दुचाकी घेऊन डी मार्टसमोरील मोकळ्या जागेत अंधारात उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने त्याला काही अंतरावरच गाठून ताब्यात घेतले.

 

Brilliant performance of Adgaon police

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago