महासभेत महापौरांसह उपमहापौरांची निवड; घडामोडींना वेग
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. 16 जानेवारी रोजी लागलेल्या निकालात भाजपने 72 जागा मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. परंतु महापौरपदी कोणाला संधी द्यायची? यावरून पक्षात जोरदार खलबते सुरू आहेत. मात्र, आता महापौरपदावर लवकरच पडदा पडणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विशेष महासभा आयोजित करण्याचे
निर्देश दिले आहेत.
भाजप आपल्या नगरसेवकांच्या गटाची स्थापना बुधवारी (दि.28) विभागीय आयुक्तांकडे करणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून प्रसिद्धिपत्रक जारी केले जाणार आहे. त्याद्वारे विशेष महासभेत महापौर पदाची निवड केली जाणार आहे. दि. 6
फेब्रुवारीला भाजपचे नगरसेवक पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील. महासभेत महापौरांसोबतच उपमहापौर पदाचीही निवड होणार आहे. या पदासाठीही भाजप उमेदवाराची वर्णी लागणार आहे. महासभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अथवा त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. निवड प्रक्रिया नियमांनुसार पार पडणार आहे.
महासभेत नाशिकचा प्रथम नागरिक कोण, याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. त्याची उत्सुकता लागली आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 72 जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवले. महापौरपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार? याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झालेेली नाही. दरम्यान, महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिककरांचे लक्ष
दरम्यान, महापौरपदाची निवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता व स्मार्ट सिटी प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नव्या महापौरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपचे महापौरपद निश्चित असले तरी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.
धक्कातंत्राचा वापर
महापौरपद निवडीत भाजप धक्कातंत्राचा वापर तर करणार नाही ना? याचा धसका महापौरपदाच्या प्रबळ इच्छुकांनी चांगलाच घेतला आहे. भाजप आपल्या धक्कातंत्रासाठी ओळखले जातो. त्यामुळे जोवर नाव निश्चित होत नाही तोवर
काहीच सांगता येत नाही, अशी सावध प्रतिक्रिया पक्षातून व्यक्त होत आहे.
नाशिकसह या महापालिकांच्या महापौरांची निवड होणार
नाशिक महापालिकाप्रमाणेच धुळे, अहिल्यानगर, जळगाव या महानगरपालिकांचीही येत्या शुक्रवारी (दि. 6 फेब्रुवारी) महासभा बोलावण्यात आली आहे. मालेगाव महानगरपालिकेची शनिवारी म्हणजेच 7 फेब्रुवारीला विशेष महासभा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. वरील सर्व महापालिकांची सकाळी अकरा वाजता महासभा होणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांची निवड करतील. यावेळी विभागीय आयुक्तांंचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकार्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदींचे पालन करून सभेचे कामकाज पार पाडावे, तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
It’s decided! The first citizen will be granted on February 6th.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…