आस्वाद

जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन

लेखिका: आरती डिंगोरे

पंचमहाभूतांपैकी पृथ्वी एक तत्व आहे.सृष्टीचे पालन करणारे. संपूर्ण विश्वाचा आधार असलेले.तिला अवनी, भुवनी, धरणी, धात्री ,वसुधा, वसुंधरा, पृथ्वी,पृथा, भुवनेश्वरी आदी नावांनी ओळखली जाते. तिच्याविषयी बोलायचं झालं तर;
“पेरता चार दाने चारशे पटीत ती देते,
थोर पुण्याई तिची आजन्म जीवाला पोसते.
लई मायाळू ही माती, साऱ्या चिंता मिटवते,
झळा सोसूनी उन्हांच्या भार साऱ्यांचा वाहते”.
अशा ह्या भूमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच सकाळी झोपेतून उठल्यानंतर,” समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले, विष्णूपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे|| म्हणजेच समुद्ररूपीवस्त्र धारण करणाऱ्या, पर्वतरुपी स्तन असणाऱ्या,श्रीविष्णूची पत्नी आम्ही तुला नमस्कार करतो. आमच्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे याकरीता तू आम्हांला क्षमा कर.असे ऋषीमुनींनी सांगितले आहे. अथर्ववेदात’ वसुधैव कुटुंबकम’ ही भावना विकसित होण्याच्या दृष्टीने’ पृथ्वी सुक्त गायले आहे. प्रकृती आणि पर्यावरणाबाबतचे महत्त्वपूर्ण असे ज्ञान त्यात सांगितले आहे.म्हणूनच आपल्या देशात प्रकृतीची पूजा केली जाते. नदीला ,गाईला ,भूमीला ,राष्ट्राला माता मानले जाते.
झाडे ,पर्वत ,नद्या,ग्रह ,नक्षत्र आणि वायू यांच्यासोबत माणसाचं वेगळं नातं आहे. शास्त्रामध्ये जीवन जगण्याच्या वैज्ञानिक पद्धती सांगितल्या आहेत.’ जगा आणि जगू द्या’ हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. म्हणूनच प्रकृतीबाबत आपण संवेदनशील आहोत. ऋषीमुनी हे जाणून होते की,पृथ्वीचा मूलाधार पाणी आणि वने आहेत. जीवनातील चारही आश्रमांचा संबंध (ब्रह्मचर्याश्रम , गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम )पाणी आणि जंगल यांच्याशी आहे .पृथ्वी माता असून सूर्य पिता आहे .प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध एक दुसऱ्यांवर आधारित आहे. म्हणूनच पृथ्वी,पृथ्वीवरील झाडे,पाणी,हवा, खनिजे,या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण, संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
परंतु माणूस अशाश्वत भौतिक विकासाच्या मागे धावत सुटल्यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचाराने वापर करू लागला. परिणामतः हवा, पाणी, भूमी प्रदूषणात वाढ झाली. ध्वनी प्रदूषणही डोकावू लागले. सिमेंटची जंगले उभी राहिली. नद्या-विहिरी यांचे नैसर्गिक झरे आटले .लोकसंख्या वाढ ,औद्योगीकरण, प्लास्टिकचा अतिवापर,रासायनिक शेती, वन्यजीव आणि वनसंपदेची तस्करी, अवाजवी वृक्षतोड यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला. जैवविविधता तसेच अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ चित्ता, वाघ, साप, कावळा चिमण्या, कासव, घुबड, उंदिर इ. या प्राण्यांची तस्करीही होत असल्यामुळे ते नामशेष होत आहेत. ऋतुचक्रामध्ये बदल होत आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रेखाटलेले वसुंधरेचे चित्र किती मनोहारी होते.” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.” आता मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे राहणीमानात बदल झाले. परिणामतः वैयक्तिक, सामाजिक जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषणामुळे विविध आजार, रोगराई, महामारी निर्माण होत आहे. हे असेच चालू राहिले तर मानवाचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित.
याकरीताच गेल्या पन्नास वर्षांपासून ‘जागतिक वसुंधरा दिन’ हा साजरा केला जात आहे.अमेरिकेतील जेराल्ड नेल्सन यांनी जागतिक ‘पृथ्वी दिन’ ही संकल्पना मांडली. प्रदूषण आणि वन्यजीव यांचा ऱ्हास या दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन १९७० मध्ये प्रथम ‘जागतिक वसुंधरा दिन साजरा’ केला गेला. मानवाला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर निसर्ग आणि मानव यात संतुलन राहणे आवश्यक आहे. याची जाणीव झाल्याने शासन, वनविभाग, स्वयंसेवी संस्था, कर्तव्यदक्ष नागरिक, निसर्गप्रेमी वारंवार स्थानिकांचे समुपदेशन करत आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याकरीता विविध उपक्रम राबविले जात आहे.प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी समुपदेशन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, विविध कार्यशाळा, शालेय-महाविद्यालय शिक्षणात पर्यावरण शिक्षणाचा अंतर्भाव, वनतस्करी व प्राण्यांची शिकार रोखण्याकरीता कायद्याची अंमलबजावणी आदी प्रयत्न केले जात आहेत.
परंतु केवळ कायद्याचे नव्हे तर सृष्टीचेही ज्ञान समजून घेणारी,गतकाळाचा अभ्यास करून भविष्यकाळ उज्वल करणारी पिढी निर्माण होणे गरजेचे आहे; मात्र ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे विसरून चालणार नाही.
चला तर मग,” झाडे लावूनी वसुंधरेला सुंदर करूया,गतवैभव पुन्हा मिळवून तिला देऊया”.

 

आरती डिंगोरे.✍

Bhagwat Udavant

Recent Posts

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा नाशिक दौरा रद्द

नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…

7 hours ago

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

20 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

22 hours ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

1 day ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

1 day ago

नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…

3 days ago