नाशिक : वार्ताहर
महाराष्ट्र दिन, रमजान ईद व अक्षयतृतिया,शहरातील पारंपारिक सण, उत्सव, यात्रासह मनसेनेे भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाने पुन्हा शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. यातंर्गत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 29 ते 13 मेपर्यंत जमाव बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कळविले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये दि.29 एप्रिल 2022 रोजी 00.01 पासून ते दि. 13 मे पर्यंत 15 दिवसांसाठी महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 (1) (3) चा अंमल जारी करण्यात येत आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.
हे राहणार नियम
पाच किंवा पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे पूर्व परवानगीशिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढण्यास बंदी.
कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे बाळगण्यास परवानगी नाही.
घोषणा देणे, वाद्य वाजविण्यावर बंदी
भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे जनतेत प्रसार करणे
या कृत्यांवर बंदी.