येवला तालुक्यातील जवानाचा अपघाती मृत्यू
येवला: प्रतिनिधी
तालुक्यातील मानाेरी येथील भारतीय सैन्य दलातील जवान अजित शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल येवला तालुक्यावर शाेककळा पसरली आहे जवान अजित शेळके हे राजस्थान येथे सेवेत हाेते . आपले कर्तव्य बजावुन शेळके आपल्या दुचाकीने जात असताना अपघात हाेऊन ते गंभीर जखमी झाले होते त्यांना येथिल हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले हाेते, तथापि प्रकृतीत सुधारणा हाेत नसल्याने त्यांचे निधन झाले. या निधनामुळे येवला तालुक्यातील नागरीकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे दरम्यान उद्या साेमवार राेजी त्यांच्या मानाेरी गांवी त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहिद जवान अजित शेळके यांच्या निधना बद्दल दु:ख व्यक्त केले आहे.