महाराष्ट्र

जाये तो जाये कहा!

कामगारवर्ग हा जगाचा आधारस्तंभ आहे, परंतु दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. दरवर्षी 1 मे जगभर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कामगार दिवस काळोखात असल्याचे आपण पाहिले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांत कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतासह जगभर कामगारांचे हाल-बेहाल झाल्याचे सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. आज जगाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यात अनेक क्षेत्रांतील कामगार वर्ग दिसून येतात. शेतीतील कामगार असो, कारखान्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयना अवस्था आहे. परंतु दोन वर्षांच्या काळात कोविड-19 कामगारांसाठी मौत का कुआ बनल्याचे जगाने पहिले.कोरोना काळात भारतासह जगभरात कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची घटना होती.आज विकसित, विकसनशील, गरीब या संपूर्ण देशांतील कामगारांवर जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे. आज भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. यात कामगारवर्गाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यावरून आपण विचार करू शकतो की, कोविड-19 च्या संक्रमणामुळे कामगारांचे किती हाल-बेहाल झाले असतील. ही बाब संपूर्ण जगाने उघडल्या डोळ्यांनी पाहिली. कोरोना काळात स्वत:च्या गावाला जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कामगार आपल्या गावाला जाण्याकरिता 200, 500, 900 किलोमीटरपर्यंत पायदळ चालतानाचे दृश्य आपण पाहिले. देशाचा विचार केला तर राजकीय पुढार्‍यांजवळ अरबो-खरबो रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. ही संपत्ती राजकीय पुढार्‍यांनी कामगारांच्या प्रती उपयोगात आणली तर एक मदतीचा मोठा हात समजला जाईल. कामगार जगाचा शिल्पकार मानला जातो. यांची भूमिका देशासाठी व जगासाठी महत्त्वाची असते. आज शिल्पकाराचे हाल-बेहाल होत असल्याचे दिसून येते. कामगार हा जगाचा मोठा आधारस्तंभ आहे. कामगार नाही तर काहीच नाही.
रमेश लांजेवार

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago