राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

एल निनोमुळे यंदाचा जून महिना ठरणार तापदायक

आठ राज्यांत उष्णतेचे सर्व विक्रम मोडले जाण्याची भीती

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा दुसरा अंदाज जारी करताना, जून महिन्यात केवळ 90% पाऊस सांगितला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये गंभीर पूर येण्याची शक्यताही वर्तवली आहे. दुसरीकडे, मान्सूनवर एल-निनोची गडद छाया असल्याने, जूनच्या सुरुवातीपासून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह आठ राज्यांमध्ये उष्णतेचे विक्रम मोडले जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील काही भागालाही तडाखा बसण्याची भीती आयएमडी महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल आणि रात्रीचे किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा जास्त राहतील. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जून महिन्यात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येतील. महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

June this year will be hot due to El Nino

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago