प्रादेशिक

कांद्याने केला वांधा

लासलगाव : वार्ताहर

मार्च एन्डच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शनिवार दि २ मार्च रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ व लाल कांद्याची अंदाजे १६ ते १७ हजार क्विंटल आवक झाली.३० तारखेपासून मार्च एन्ड मुळे बाजार समितीला तीन दिवस सुट्टी असल्याने बाजार समितीचे कामकाज बंद होते.आज शनिवारी शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यासाठी येथील बाजार समितीत गर्दी केली.

२९ तारखेच्या तुलनेत आज शनिवारी उन्हाळ कांद्याच्या सरासरी बाजारभावात २०० रुपयांची घसरण झाली तर लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात १०० रुपयांची घसरण पहायला मिळाली.लासलगाव बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची १६ ते १७ हजार क्विंटल आवक होऊन उन्हाळा कांद्याचे बाजारभाव किमान ४०० रुपये, कमाल १२५२ रुपये तर सरासरी भाव १००० रुपये प्रति क्विंटल राहिले तर लाल कांद्याचे बाजार भाव किमान ३०० रुपये,कमाल ९०३ रुपये तर सरासरी भाव ७०० रुपये होते

हंगामाच्या सुरुवातीला असलेला विक्रमी दर जास्त काळ २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता कमीतकमी ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपला.यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.आता कांदा उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत सापडला आहे.कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत असताना आता दुष्काळात तेरावा महिना अशी परस्थिती निर्माण झाली आहे.

Team Gavkari

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago