गोरख काळे
राज्यात शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडनुकीचा बिगूल वाजून झाल्यानंतर आता पुण्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. राज्यातील सत्ता उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि महा विकास आघाडी सरकार जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे राजकिय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात मागील सहा ते सात महिन्यात अशा काही घटना घडल्यात की त्या, जनसामांन्यांच्या दुष्टीने खळ्बळ उडवून देणार्या ठरल्या आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आणि त्यांचा कौल काय, या सर्वांची उत्तरे कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालातून समोर येणार आहे. मात्र या निवडणुकीत जे निकाल येतील ते आगामी नाशिकसह इतर महापालिकांच्या निवडणुकीवर त्यांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
कसबा आणि चिंचवड या निवडनुकीच्या माध्यमातून जनता कोणाच्या बाजूने त्यांचे मत टाकणार यावरील चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत महा विकास आघाडीला यश मिळाले होते. त्या निवडणुकीत शिक्षक व पदवीधरांनाच मतदानाचा हक्का होता. मात्र कसबा आणि चिंचवडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक थेट मतदान केंद्रावर जाणार आहे. यापूर्वी मुंबइत अंधेरी पोटनिवडणुकीत जनतेच्या मनता काय हे समजून येण्यापूर्वी भाजपने माघार घेऊन टाकली होती. त्या निवडणुकीनंतर आता एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिंदे यांच्या मध्ये समोरासमोर लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालातून मात्र नाशिक पालिका निवडणुकीत काय प्रभाव जाणवेल, यावरुन बरीच चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही ठिकानांचा कल ज्याच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने जनमत असणार असे बोलले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कसबा, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहेत. या दोन्ही निवडणुका पुण्यात होत असल्या तरी त्यांचे पडसाद येणार्या नाशिक महानगर पालिका निवडणुकीत दिसून येऊ शकतात.
नाशिक पालिकेत प्रशासक राजवटीला वर्षपूर्ती
नाशिक महानगरपालिकेची वेळेत निवडणूक न झाल्याने 13 मार्च रोजी महापालिकेत प्रशासक राजवट येऊन वर्षपूर्ती होणार आहे. अद्यापही पालिका निवडणूक संदर्भात कोणतीही शक्यता दिसून येत नाही. परंतू ऑक्टोबर मध्ये निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यात होणार्या निवडणुका एकप्रकारे जनमत चाचणी यानिमित्त्ताने होत असल्याची चर्चा नशिकच्या राजकीय वर्तुळात आहे.
….
नाशकातील शिंदे ठाकरे गट लक्ष ठेवून
नाशिक शहरात शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांचे लक्ष देखील या निवडणुकीकडे लागून आहे. सध्य सोशल मीडियावर भाजपविरोधात अन शिंदे गटा विरोधात वातावरण असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो आहे. दरम्यान पुण्यातील निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नसले तरी त्याकडे नाशिकमधील शिंदे आणि ठाकरे गटाचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेऊन आहेत.