आज पुन्हा कोर्टात हजर करणार
नाशिक : प्रतिनिधी
सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दुसर्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपीला आज (दि. 9) पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. यावेळी सरकारी वकील शैलेंद्र बागडे, आरोपीचे वकील सचिन भाटे आणि प्रकरणाचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी न्यायमूर्ती श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात पार पडली. दुसर्या गुन्ह्यात कोठडी मिळाल्यामुळे अशोक खरात याला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी एसआयटीकडून पुन्हा आरोपीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Kharat remanded in judicial custody, will be produced in court again today