नाशिक

खरातची पत्नी फरार; मुलाला घेतले ताब्यात

सिडको : प्रतिनिधी
शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस येण्यापूर्वीच खरातची पत्नी कल्पना फरार झाली. त्यामुळे पथकाने खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. ग़ुन्हा दाखल होताच शिर्डीतून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. खरातची पत्नी कल्पना हिला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक मंगळवारी सायंकाळी खरातच्या कर्मयोगीनगर भागातील तृप्ताबाला या बंगल्यात पोहोचले. मात्र, पोलीस येणार अशी कुणकुण लागल्याने खरातची पत्नी फरार झाली. त्यामुळे एसआयटीच्या पथकाने खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेण्यात आले आहे. या ताब्यानंतर प्रकरणाशी संबंधित आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सकाळी अरविंद बोरावके, आणि किरण सोनवणे या दोघा संशयित आरोपींना अटक केली असली तरी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. तिच्या मागावर दोन पथके असून, ते पुणे आणि नाशिकमध्ये शोध घेत आहेत.
दरम्यान, अशोक खरात याच्यावर आधीपासूनच बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप असून तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्याविरोधात नवनवीन प्रकरणे उघडकीस येत असल्याने तपास अधिक संवेदनशील बनला आहे आणि राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
पोलिसांच्या मते, हर्षवर्धन खरातच्या चौकशीतून आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीतील अनियमितता तसेच इतर संबंधित बाबींविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे.या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kharat’s wife absconding; son taken into custody

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago