महाराष्ट्र

आर्थिक वर्षात रेडीरेकनर दर स्थिर

मुंबई :
राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत फडणवीस सरकारने नवीन सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे हे दर मागील वर्षाप्रमाणेच (सन 2025-26) ’जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत
काय बदल?
मागील काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, रेडीरेकनरच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले होते.
सन 2017-18 : राज्याकरिता सरासरी 5.86 टक्के वाढ झाली होती. सन 2020-21 : कोरोना संकटामुळे केवळ 1.74 टक्के इतकी माफक वाढ करण्यात आली होती. सन 2022-23 : 4.81ट क्के वाढ झाली होती, जी पुढे दोन वर्षे कायम ठेवली गेली. सन 2025-26 (मागील वर्ष): मागील वर्षी ग्रामीण भागात 3.36टक्के , नगरपालिका क्षेत्रात 4.97टक्के , तर महानगरपालिका क्षेत्रात 5.95टक्के वाढ करण्यात आली होती. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी ही वाढ 3.39टक्के होती. मात्र, सन 2026-27 साठी संपूर्ण राज्यात सर्व ठिकाणचे दर स्थिर ठेवण्यात आल्यामुळे सामान्यांच्या खिशाला अधिक कात्री लागणार नाही.

महसुलाचा आकडा 60 हजार कोटींच्या पार

दर स्थिर असले, तरी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या महसुलात मात्र मोठी भर पडली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात (30 मार्च 2026 पर्यंत) शासनाला एकूण 60,568.94 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा ’आय-सरिता’ प्रणालीचा असून, त्याद्वारे 49,534 कोटींचा महसूल जमा झाला आहे.

♦ घर खरेदीदारांना मिळणार उभारी.
♦ फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा.
♦ नवीन दर मागील वर्षाप्रमाणेच जैसे थे राहणार.

तांत्रिक सुधारणांवर भर
दर वाढवले नसले तरी, वार्षिक मूल्यदर तक्त्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मंजूर प्रादेशिक आणि विकास योजनांची अंमलबजावणी, नवीन सर्व्हे नंबरची नोंद, आणि गहाळ गावे किंवा गावांच्या नावातील दुरुस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वास्तववादी होणार आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन: महाराष्ट्र राज्यात रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणे, हे राज्यातील घर खरेदी करणार्‍या सामान्य कुटुंबासाठी एक मोठा दिलासा आहे. सरकारने हा निर्णय घेतला, यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि राज्याच्याआर्थिकवृद्धीला एक मजबूतीचा आधार मिळेल, या धोरणासाठी सरकारचं अभिनंदन !
– दीपक चंदे, बांधकाम व्यवसायिक

जागतिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील सध्याची मंदी विचारात घेता, क्रेडाईसारख्या बांधकाम व्यावसायिक संघटनांनी राज्य सरकारकडे हे दर स्थिर ठेवण्याची विनंती केली होती. दस्त लेखनिक तसेच यासंदर्भातील सूचना, हरकती, विनंतींचा यथायोग्य विचार करून, बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाने दरवाढीची टक्केवारी ’निरंक’ ठेवली आहे. मिळकतींचे वास्तव लक्षात घेऊन बाजारमूल्य निश्चित करण्यात आले आहे.
– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

Ready reckoner rate stable in the financial year

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago