चास खिंडीत शेतकर्‍याची दगडाने ठेचून हत्या

अंधश्रध्देतून नरबळीचा संशय
सिन्नर
तालुक्यातील नांदूरशिंगोटे-चास रोडवर, चास खिंडीत एका 65 वर्षीय वृध्दाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.23) सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भाऊसाहेब रामनाथ आहेर (65), रा. लोणी खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर असे मृताचे नाव आहे. मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली आणि दहा फुट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने हा अंधश्रध्देतून अघोरी कृत्य करत नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चास खिंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिरापासून 100 फुट अंतरावर, वनविभागाच्या जागेत निर्जन स्थळी हा मृतदेह पडलेला होता. गायी चारणार्‍या गुराख्याने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. सरपंच गोपाळ शेळके यांनी नांदूरशिंगोटे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर यांना  दिलेल्या माहितीनंतर वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर, सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या खिशात 7/12 उतारा देखील आढळून आला.   मयत भाऊसाहेब आहेर यांचा भाऊ  कैलास रामनाथ आहेर वय 50, धंदा- शेती रा. लोणी खु, नळेगांव रोड, शिंदे वस्ती ता. राहता जि. अहमदनगर यांनी वावी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार  भाउसाहेब रामनाथ आहेर हे त्यांची पत्नी मथुराबाई, मुलगा एकनाथ यांच्यासह   त्यांच्या शेतामध्ये वस्ती करून राहतात. मुलगा एकनाथ दारू पिण्याची सवय असल्यानेे त्याची दारू सोडण्यासाठी त्यावर उपचार करण्यासाठी भाउ भाउसाहेब हे नेहमी कुठल्यातरी बाबीकडे जात येत होते.
गुरुवारी (दि.22) सायकाळी 4 वाजेच्या सुमारास भाउसाहेब आहेर हे घरातून कोणास काहीएक न सांगता निघुन गेले होते. शुक्रवारी (दि.23) सकाळी 11.30 वा. सुमारास  लोणी खुर्द  गांवातील शरद बाबासाहेब आहेर यांनी कैलास फोन करून सांगिताने की, नांदुर शिंगोटे गावाजवळ एका इसमाचे खिशात तुमचे नावांचा 7/12 उतारा मिळाला आहे तसेच त्याचा फोटो माझे मोबाईलवर आलेला आहे. मी तुम्हाला पाठवितो असे म्हणून त्याने माझे मोबाईलवर मयताचा फोटो पाठविला तो मी बघीतला सदरचा फोटोमधील इसम भाउसाहेब रामनाथ आहेर यांचा असल्याचे  ओळखले त्यानंतर कैलास आहेर, विलास आहेर, शरद बाबासाहेब आहेर, गोतम दिलीप आहेर असे गाडी करून नांदूरशिंगोटे  शिवारात चास खिड़ी जवळ पोहचले व त्यांनी मृताची ओळख पटवली.याबाबत वावी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांनीही घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाकामी सूचना केल्या. श्वानपथक, ठसे तज्ञ, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक यांनी घटनास्थळी येऊन नमूने ताब्यात घेतले. 7/12 वरुन लागला तपास मृतदेहाच्या खिशात पोलिसांना आढळून आलेल्या 7/12 उतार्‍यावर भाऊसाहेब रामनाथ आहेर यांच्या नावाची नोंद होती. मृतदेहाजवळ पडलेल्या दोन फोेन पैकी एका फोनवरुन संपर्क साधला असता मयत व्यक्ती भाऊसाहेब आहेरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटविली.
संपत्तीचा वाद कि अंधश्रध्देचा बळी ?
लोणी खूर्द, ता. राहाता येथील भाऊसाहेब आहेर हे गुरुवारी (दि.22) दुपारी 4 वाजता आपल्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडले होते. शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटूंबियांना पोलिसांकडून हत्येची बातमी समजली. निर्व्यसनी, धार्मिक प्रवृत्तीच्या भाऊसाहेब आहेर यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाली की, ते अंधश्रध्देचा बळी ठरले याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago