किळसवाणे: तरुणाचा गायीवर अत्याचार, सातपूरमधील प्रकार; तरुणास अटक

किळसवाणे: तरुणाचा गायीवर अत्याचार

सातपूरमधील प्रकार; तरुणास अटक

नाशिक : प्रतिनिधी

सातपूर गावातील मारुती मंदिर येथे अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे. सातपूर गावातील मारुती मंदिर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाने रात्रीच्या सुमारास गायीवर अनैसर्गिक अत्याचार केला. तरुणाचे हे कृत्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे

संबंधित तरुणावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे किळसवाणं  कृत्य परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं ग्रामस्थांकडून या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आसता हा तरुण    सातपूर मळेभागात  रहात होता ३० ऑगस्ट रोजी घटना घडली,
नंतर सातपूर पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या काही दिवस आधी आणि नंतरचे फुटेज पोलीस अधिकारी तपासात आहेत.३१ऑगस्ट रोजी सातपूर पोलीस स्टेशनला नागरिकांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत असे सांगितले गेले होते की, या २५ वर्षीय तरुण  गायीवर अनैसर्गिकरित्या अत्याचार   करत होता. तक्रारदाराने पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पुरावा म्हणून दिले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीही केली जात असल्याचे सातपूर पोलीसांनी  सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *