किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा

लासलगाव प्रतिनिधी

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांनी घोटाळा केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे पो उ नि आदिनाथ कोठुळे यांना शिवसेना निफाड पुर्व तालुका पदाधीकारर्‍यांनी दिले आहे.या वेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मोहीम सुरू केली.केंद्र आणि राज्य सरकाराने असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आले आणि प्रचंड निधी गोळा केला.त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डब्बे घेऊन उभे राहिले.आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केले.नेव्हीनगरमध्ये राहणार्‍या नौदलाच्या अनेक अधिकार्‍यांनी प्रत्येकी 5 ते 10 हजार रुपये दिले. या रकमेचं किरीट सोमय्यांनी काय केलं ते देशाला समजायला हवं.ही रक्कम ते भंगारात जाऊ पाहणार्‍या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरित राजभवन येथे जमा करणार होते मात्र सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे.

लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केली आहे.त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं ? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्‍वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली.राजभवनान आपल्याला किरीट सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे

किरीट सोमय्यांनीे गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे 100 कोटींचा घोटाळा करुन हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा अंदाज व्यक्त -केला जात आहे.अशा देशद्रोही कृतीमुळे किरीट सोमैय्याला राज्यात काय देशातही राहण्याचा खरेतर अधिकार अधीकार नाही.या देशद्रोह्याची जागा तुरूंगातच असायला हवी अशी मागणी या वेळी तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी या वेळी केलीयावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटिल,उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप,जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप,पं.स.सदस्य शिवा सुराशे,माजी पं.स. उत्तम वाघ,उपतालुकाप्रमुख बापु सोदक,तालुका संघटक किशोर दरेकर,तालुका समन्वयक केशवराव जाधव, शहरप्रमुख प्रमोद पाटील,सुनील आब्बड,उत्तम वाघ,ऍड निलेश शिंदे,युवासेना उपजिल्हाप्रमुख रविराज शिंदे, युवासेना शहरप्रमुख दत्ता पाटील,हर्षल काळे,दिलीप चव्हाण,रवीराज बोराडे,अक्षय सोनवणे,सचिन जोशी, सुमंत कारवाळ,नंदु कुर्‍हाडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One thought on “किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *