महावितरणच्या उपअभियंत्यासह तिघांना लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
पंधरा दिवसांपूर्वीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि लिपिकाला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले.
उपकार्यकारी अभियंता श्रीमती दीप्ती वंजारी, सहायक अभियंता राजेंद्र पाटील, लिपिक सचिन मुरलीधर बोरसे यांनी तक्रारदाराचे दोन विद्युत रोहित्र हलविण्याबाबत कामाचे दोन अंदाजपत्रक तपासणी करुन प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी तिघांनी मिळून साडेसहा हजार रुपयांची लाच मागीतली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार लावण्यात आलेल्या सापळ्यात तिघे अडकल्याने त्यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, हवालदार पंकज पळशीकर, नितीन कराड, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…