नाशिक

पौष्टिक नाश्त्याची लज्जत न्यारी

नाशिक : प्रतिनिधी
दै. गांवकरी, दीप अप्लायन्स, गजानन एन्टरप्रायजेस आणि लायन्स क्लब यांच्या विशेष सहकार्याने जागतिक  महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकाहून एक पदार्थांचे प्रकार पाहून उपस्थितही आश्‍चर्यचकित झाले.
गांवकरी भवनमध्ये काल झालेल्या या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी खुटाडे, द्वितीय क्रमांक माधुरी तांदळे, तृतीय  क्रमांक स्नेहल कोठावदे यांना मिळाला.  विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास सहभागाबद्दल बक्षीस देण्यात आले. यावेळी सावानाचे उपाध्यक्ष  वैद्य विक्रांत  जाधव, मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वागताताई उपासनी, दीप अप्लायन्सचे संचालक दीपक आहुजा, गजानन एन्टरप्रायजेसचे गणपत हडपे, परीक्षक ऍम्रो कॉलेजच्या प्राचार्या सुनंदा सोनी, नयना अमृतकर, मानसी सोमन, ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या पुष्पादीदी, गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, उपसंपादक देवयानी सोनार, उपसंपादक गोरख काळे, उपसंपादक अश्‍विनी पांडे, बाळासाहेब सोनावणे, नयना बारिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत उदावंत यांनी तर सूत्रसंचालन के. के. अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहिद बागवान, समाधान रोकडे, गजानन वैद्य, पवन उदावंत यांनी परिश्रम घेतले.

स्तुत्य उपक्रम
महिला दिनाचे औचित्य साधत दैनिक गांवकरीने स्तुत्य उपक्रम राबविला. महिलांना आपल्यातील कलागुण सादर केले. महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करते. कितीही जबाबदार्‍या आल्या तरी योग्य नियोजन करून पार पाडण्याचे कसब महिलांकडे आहे. घरातील गृहिणी असो वा जेट चालविणारी महिला सर्वांत आधी आपले घर कसे आरोग्यदायी राहील हा विचार प्रत्येक महिलेकडे असतो. त्यामुळे प्रत्येक महिला ही सुगरणच असते. आपल्या पदार्थांना नाव देऊन आपणच आपला ब्रँड द्यावा.आपल्या किंवा देशी नाव पदार्थाला दिल्यास वेगळा बॅ्रड तयार होईल.

– वैद्य विक्रांत जाधव
प्रत्येक महिला सुगरण
प्रत्येक महिलेत एक ऊर्जा आहे. प्रत्येक महिला सुगरण आहे. स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी विविध पदार्थ बनवून आणले.अशाच पद्धतीने कुटुंंबातील लहान-मोठ्यांचा विचार करून पदार्थ बनविले जातात. त्यामुळे आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.
– सुनंदा सोनी, परीक्षक
आरोग्याप्रति महिला सजग
पौष्टिक पदार्थांची रेलचेल पाहून आरोग्याप्रति महिला सजग असल्याचे समाधान वाटले. एवढ्या पदार्थांमधून एक विजेते काढणे अवघड होते. परंतु रंग, चव, सजावट सर्व विचारात घेऊन विजेते निवडले. महिलांचा उत्साह खूप होता.
मानसी सोमण (परीक्षक)
नावडत्या पदार्थांना बनविले आवडते
महिलांनी सर्व पदार्थ खूप मेहनतीने बनविलेले होते. महिलंाचा उत्साह अपूर्व होता. पदार्थातील घटक सर्वांना आवडतील असे होते. नावडते पदार्थ आवडेल अशा पद्धतीने रूप, चव दिल्याने अनोखे ठरले.
नयना अमृतकर (परीक्षक)
पाककलेचे व्यासपीठ
गांवकरीने आयोजित केलेले महिलांसाठी पाककलेचे व्यासपीठ पहिली पायरी ठरली आहे. महिलांनी पुढे आपल्या पदार्थांना बाजारात विकण्यासाठी प्रयत्न करावेत.व्यवसायासाठी लागेल ती मदत करण्यासाठी तत्पर असेन.
-स्वागता उपासनी, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी मनसे
मनाचे भाव अन्नात उतरतात
स्वयंपाक बनविताना शांत चित्ताने देवाचे नामस्मरण करीत बनविल्यास मनातील भाव बनविलेल्या अन्नात उतरतात. त्यामुळे जसे मन तसे विचार घडत असतात.
पुष्पादीदी, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय

 

 

यांनी पटकावला क्रमांक
प्रथम –  पल्लवी खुटाडे, द्वितीय -माधुरी तांदळे,
तृतीय-स्नेहल कोठावदे

आदींनी नोंदविला सहभाग
तेजस्विनी सोनार, मनीषा पूरकर, मनीषा तोरणे, नीलिमा पूरकर, सलोनी पूरकर, गायत्री पांडे, ममता बाफना, पौर्णिमा देवळीकर, साधना सालकर, प्रतिभा साबळे, पल्लवी खुटाडे, सारिका सोनजे, प्रियांका मनयाल, निकिता कुलकर्णी, सविता पावटेकर, हेमांगी गोखले, लता कुलथे, अलका सारंग, साधना पाठक, संतोषी पाटील, वैशाली चिंचोले, स्नेहल कोठावळे, वृषाली कावळे, चित्रा कुलकर्णी, रेखा धनवटे, माधुरी तांदळे, लीना कोठावदे, मीनल ओटारी, पूर्वा विसपुते, कल्पना पवार, ग्रेसी वाघमारे.

पौष्टिक पदार्थांची रेलचेल
आळीवाचे लाडू, बीटचे गुलाबजामुन, बाजरीची भेळ, पपई रताळूची खीर, सीड्स टरबूज कटलेट, जवस लाडू, कडधान्याची पिझ्झा, चटपटी कुल्फी, मटार कबाब, पालक चना रोल

उत्तम नियोजन
गांवकरीतर्फे आयोजित पाककला स्पर्धेत प्रथमच भाग घेतला. त्याहीपेक्षा दुसर्‍याने आपण नवीन पदार्थ केल्यावर मनापासून चवीनं हक्काने घेणे, टेस्ट म्हणून हे जास्त महत्त्वाचे आणि आनंदाचे वाटते. केल्याचे सार्थक आणि समाधान मिळते. सर्वांच्या घरी सर्व काही असते. पण पदार्थांची चव त्यामागे मनाची भावना आपुलकी, आपलापणा जाणवत होता. हे प्रत्येकात दिसून येत होते. गांवकरीने ठेवलेले नियोजन उत्तम होते. सर्व टीमचे मी मनापासून आभार आणि धन्यवाद देते.
सारिका सोंनजे (स्पर्धक)

महिलांना अतिशय चांगला प्लॅटफॉर्म
गांवकरीच्या वतीने आयोजित स्पर्धेत भाग घेण्याचा माझा पहिला अनुभव पण अतिशय उत्तम होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्‍याच ठिकाणी स्पर्धांमध्ये मी पण बघितलं की, जेव्हा प्राइस मिळतं तेव्हा ते आनंद होतोच, परंतु काही कारणाने जेव्हा प्राइज मिळत नाही तेव्हा खूप वाईट वाटते. परंतु गांवकरीने कुठल्याच गृहिणीला किंवा स्पर्धकाला नाराज होऊन पाठवलेलं नाहीये. सगळ्या जणींच्या चेहर्‍यावर आनंद होता. कारण आपण एखादा स्पर्धेत भाग घेतो तेव्हा त्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते. मी स्वतः देखील चार दिवस आधीपासून माझ्या डोक्यात विचार सुरू होतात की, काय नवीन करता येईल, कशी आपली डिश छान वाटेल. प्रेझेंटेशन कसे छान असेल आणि इतकी सगळी मेहनत घेतल्यावर जेव्हा काही कारणामुळे बक्षीस मिळत नाही तेव्हा फार वाईट वाटते. परंतु गांवकरीने महिला दिनाच्या सप्ताह सर्व महिलांना अतिशय चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सगळ्यांना आनंदी केलं, त्याबद्दल गांवकरी पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानते.
वृषाली कावळे, स्पर्धक
प्रत्येकाला आनंद
स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्साह होता. बक्षीस मिळेल किंवा नाही हा भाग सेाडला तर कुटुंबासाठी नेहमी पौष्टिक आणि विविध प्रकार घरी आवर्जून करण्याचा प्रयत्न असतो.
स्पर्धेतील इतर सहभागींचेही पदार्थ जाणून घेता आले. दै. गांवकरीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याशिवाय सहभागींनाही फुल ना ङ्गुलाची पाकळी भेटवस्तू मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. श्रमाचे चीज झाले.
पूर्वा विसपुते, स्पर्धक
Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

2 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

3 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

3 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

4 days ago