सातपूर :प्रतिनिधी
त्रंबक रोड विद्या मंदिर येथ त्र्यंबकवरून नाशिककडे जाणाऱ्या श्रीराम बस ट्रॅव्हल्स 32 प्रवासी वाहणाऱ्या लक्झरी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास श्रीराम ट्रॅव्हल्स या कंपनीची बस त्र्यंबकेश्वरवरून देवदर्शन करून नाशिककडे जाताना नियंत्रण सुटल्याने ही बस न्यू पांडव हॉटेलच्या बाजूला आदळली. यात नाशिककडून त्रंबककडे जात असलेला एका युवकाचा लक्झरी बसच्या खाली येऊन जागीच मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी वाहतूक नियंत्रण कक्षाचे कर्मचारी अधिकारी, सातपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजू पठाण यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते.
या अगोदर देखील याच ठिकाणी अपघात झालेले आहेत. प्रशासनाने या रोडवर योग्य ती उपाययोजना करून अपघात टाळावे असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…