साडेतीन लाखांची लाच घेताना भूमिअभिलेखचा शिपाई जाळ्यात,निफाड येथे लाचलुचपतची कारवाई

साडेतीन लाखांची लाच घेताना भूमिअभिलेखचा शिपाई जाळ्यात
निफाड येथे लाचलुचपतची कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात भूमिअभिलेखचे अधीक्षक आणि स्वत:साठी चार लाखांची लाच मागून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना भूमिअभिलेखच्या शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नितेंद्र काशिनाथ गाढे रा. निफाड असे या शिपायाचे नाव आहे. तक्रारदार  यांच्या मावशीची मौजे  दीक्षी तालुका निफाड येथे शेतजमीन असून, ही  शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25 जानेवारीला अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत दिनांक 28 फेब्रुवारीला  मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या.  शिपाई गाढे यांनी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भाबड यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून हे काम दिलेल्या तारखेस दिनांक 07.मार्च 2025  रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक 06 मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती साडेतीन लाखांवर तडजोड केली. याबाबत तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला असता या लाचेची रक्कम काल  स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकरघारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago