नाशिक

सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

सिन्नर : प्रतिनिधी
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने वाहतूक पोलिस आणि नगरपालिकेने नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कपडे, किराणा, मिठाई, फटाके, सजावटीचे साहित्य तसेच पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, पादचार्‍यांना रस्त्यावरून मार्ग काढणेही कठीण होत आहे.
शहरातील नेहरू चौक, नवा पूल, गणेश पेठ, नाशिक वेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिर परिसर, जुनी नगरपालिका कॉर्नर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. या भागांमध्ये दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनांची गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून वाहतुकीचे नियंत्रण करावे. दुचाकींची अनियंत्रित पार्किंग रोखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. त्याचबरोबर व्यापारीवर्गानेही दुकानांसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने तातडीने समन्वय साधून ठोस उपाययोजना कराव्यात. सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता चारचाकी वाहनांना प्रमुख बाजारपेठेत प्रवेशबंदी करून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सणासुदीच्या काळात वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन हवे!

दिवाळीच्या कालावधीत तसेच त्यानंतरचे पाच ते सहा दिवस बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच शहराबाहेरील किंवा बाजारपेठेपासून काही अंतरावरील मोकळ्या जागांमध्ये चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Large crowds of citizens in the market area of ​​Sinnar city for shopping

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावांच्या सुरक्षेची धुरा तरुणांच्या खांद्यावर; 33 गावांत ग्रामरक्षक दलाचा पहारा!

वावी पोलिसांचा अनोखा उपक्रम; 327 तरुण मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत घालतात गस्त सिन्नर…

1 day ago

सातपूरमधील चाकूहल्ला, आरोपीला पाच वर्षे कारावास

भांडण सोडविण्यास गेलेल्या चुलतभावाचा चाकूच्या वारात झाला होता मृत्यू सिडको : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या…

1 day ago

मुकणे धरणात बुडालेले दोन जण बेपत्ताच

आमदार खोसकरांकडून घटनास्थळी पाहणी घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी…

1 day ago

सटाणे कर्‍ही गावात एकाच रात्री 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे

मनमाड : प्रतिनिधी मनमाड परिसरासह ग्रामीण भागात दरोडे व चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री…

1 day ago

सटाण्यात तोतया एफडीआय अधिकार्‍यांचा पर्दाफाश

मिठाई दुकानात तपासणीच्या नावाखाली दिशाभूल करणारे तिघे जेरबंद सटाणा : प्रतिनिधी शासकीय अधिकारी असल्याची बतावणी…

1 day ago

चैतन्याची अनुभूती देणारा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीच्या विशाल आणि विलोभनीय पटलावर अनेक सणांची आणि उत्सवांची अत्यंत मोहक नक्षी कोरलेली आहे.…

1 day ago