आमदार खोसकरांकडून घटनास्थळी पाहणी
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सांजेगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनिल भागुजी भदादे (वय 49) आणि तुकाराम दामू येले (वय 47, दोघे रा. सांजेगाव) अशी धरणात बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे दिवाळीत दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोघेही मुकणे धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता धरणाच्या काठावर त्यांचे कपडे व वस्तू आढळल्या. याबाबत तातडीने वाडीवर्हे पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि शोधकार्याचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने शुक्रवारी (दि. 6) सकाळपासून दिवसभर धरणात शोधमोहीम राबवली.
मात्र, अथक प्रयत्नांनंतरही सायंकाळपर्यंत दोघांचा काहीही सुगावा लागला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात घडलेल्या या घटनेने सांजेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. दोघांचाही शोध लागावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Two people who drowned in Mukane Dam remain missing
वावी पोलिसांचा अनोखा उपक्रम; 327 तरुण मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत घालतात गस्त सिन्नर…
भांडण सोडविण्यास गेलेल्या चुलतभावाचा चाकूच्या वारात झाला होता मृत्यू सिडको : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या…
मनमाड : प्रतिनिधी मनमाड परिसरासह ग्रामीण भागात दरोडे व चोर्यांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री…
मिठाई दुकानात तपासणीच्या नावाखाली दिशाभूल करणारे तिघे जेरबंद सटाणा : प्रतिनिधी शासकीय अधिकारी असल्याची बतावणी…
सिन्नर : प्रतिनिधी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून,…
भारतीय संस्कृतीच्या विशाल आणि विलोभनीय पटलावर अनेक सणांची आणि उत्सवांची अत्यंत मोहक नक्षी कोरलेली आहे.…