लासलगाव येथे भरदिवसा सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न
लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या
एका नामांकित सोनाराच्या दुकानात भरदिवसा सोन्याची पोत चोरी करणाऱ्या चोरास दुकानात उभ्या असलेल्या ग्राहकांनी दुकानदारांच्या मदतीने पकडला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मंळगवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दुकानदार ग्राहकाला पोत आणि सोने व चांदीची दागिने दाखवत असतांना तोंड बांधलेला एक चोरटा दुकानात शिरला.त्यानंतर त्याने दुकानदार आणि ग्राहकाची नजर चुकून तीन तोळ्याची अंदाजे दोन लाख रुपये किंमतीची पोत उचलून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुकानात असलेल्या ग्राहकाने या चोरट्याला पकडले. त्यानंतर दुकानदारही पुढे आले.त्यामुळे या चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला.हा चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या सीसीटिव्ही कॉमेऱ्यात कैद झाला.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…