महाराष्ट्र

लेकी घराचं चांदणं

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत एकेकाळी मुलीच्या जन्माचं ओझं वाटत होतं… मुली परक्याचं धन म्हणून तिच्या जन्माचं स्वागत केलं जात नसे. पण आज काळ बदलला आणि मुलींविषयीच्या भावना काही प्रमाणात बदलल्या आहेत. मुली उच्च शिक्षण घेताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळत आहे. त्या आपल्यातील क्षमता सिद्ध करू लागल्या आहेत.
खरंच लेकी या घराचा भावनाप्रधान कोपरा असतात. हसतखेळत अंगण असतं. तिच्या जन्माने मनोमन आई सुखावते. तिच्या बाललीलांनी घर आनंदी होते. तिची दुडूदुडू पावले घराचं गोकुळ बनवतं. ती जन्मत:च समजदार असते. आईच्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण ती करत असते व त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असते. ती जशी मोठी होत जाते तशी तिची भूमिका बदलत जाते.ती आईची मैत्रीण बनते तर प्रसंगी आईचीच आई बनते. बदलत्या काळानुसार दोन पिढीमधील अंतर समजून सांगताना ती आईला अपडेट बनवते. कधी कधी तर जगण्या-वागण्याचे कौशल्य लेकीकडून शिकायला मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी मुलीकडून शिकायला मिळतात. तिच्याइतके समजदारपणे कुणीच आईला सांगू शकत नाही. आई आणि मुलीचं नातं जगावेगळं असतं. कधी रुसवेफुगवे, कधी आनंदाचे चांदणे. लेकी या आईचं प्रतिबिंब असतात. आई आपले स्वप्न लेकीमध्ये बघत असते. आपल्याला जे करता आलं नाही ते आपल्या लेकीने करून दाखवावं, असं मनातलं तिचं एक अबोल स्वप्न असतं. आपली मुलगी समाजात एक आदर्श कन्या व्हावी, असे संस्कार प्रत्येक आई मुलीवर करत असते.
आईप्रमाणेच वडिलांच्या काळजाचा तुकडा लेक असते. आपल्या मुलीला सर्व सुखे मिळावी, तिची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत, समाजात ती सुरक्षित राहावी यासाठी वडील कायम दक्ष असतात. तिच्या पंखांना भरारी देण्यासाठी ते नेहमीच तयार असतात.
अभ्यासाच्या बाबतीतही मुलींना जास्त सांगावे लागत नाही. त्यांना स्वतःच्या क्षमता कळतात आणि त्याप्रमाणे संधी मिळेल त्याप्रमाणे थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय ठरवून त्या वाटचाल करत असतात. एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्या अगदी मन लावून पूर्ण करतात. आज मुलींनी यशाच्या अनेक पायर्‍या पादाक्रांत केल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य पणाला लावून त्या समाजाच्या दिशादर्शक ठरत आहेत. आई-वडिलांचा अभिमान जपत नाव मोठं करत आहे. उतारवयात आई-वडिलांचा आधार बनत आहे. अशा या लेकी घराचं तेजस्वी चांदणं असतात…

सविता दिवटे-चव्हाण

Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

3 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

3 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

3 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

18 hours ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

2 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

3 days ago