पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने एका तरुणावर अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. ज्यामुळे एका तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळगाव धूम येथे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 15) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास गावाजवळ बेजेकर यांचे कुटुंब शेतात राहते. या कुटुंबातील तरुण शेतकरी अथर्व हिरामण बेजेकर हा गोठ्यामध्ये गायी बांधण्यास खुटा ठोकण्यासाठी गेला असता अचानक पाठीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, या तरुणाने मोठ्या धाडसाने आरडाओरडा करून बिबट्याला गोठ्यातून पळून लावले. मात्र, हा बिबट्या एवढ्यावरच न थांबता त्याने गायीच्या वासरावरदेखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरून येथील जवळील उसाच्या शेतात पळून गेला. सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना येथील ज्येष्ठ नागरिक रामनाथ कराळे यांनी माहिती दिली. वनपाल रेखा सानप यांनी वन विभागाची टीम सोबत घेऊन पिंपळगाव धूम येथील नागरिकांशी चर्चा करून तातडीने उसाजवळ पिंजरा लावला.

Leopard attacks a youth at Pimpalgaon Dhum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *