टोमॅटोची ‘लाली’ घसरली; निर्यातबंदीचा फटका

निफाड : तालुका प्रतिनिधी
यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्‍यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी करून दर्जेदार टोमॅटोचे पीक उभे केले. मात्र, आता ऐन काढणीच्या वेळी बाजारात टोमॅटोला अवघा 50 ते 100 रुपये प्रतिक्रेट इतका नीचांकी भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांवर हातात आलेले पीक शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे.
निफाड तालुक्यात टोमॅटोचा हंगाम सध्या ऐन बहरात आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दररोज साधारण चार लाख क्रेटची प्रचंड आवक होत आहे. हा टोमॅटो देशातील विविध राज्यांसह बांगलादेश व दुबई येथे मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. मात्र, दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमा तात्पुरत्या बंद केल्याने निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. 18 ऑक्टोबरपासून देशाच्या सीमा पुन्हा खुल्या होणार असून, टोमॅटो निर्यातीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सोमवारनंतर बाजारभावात सुधारणा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, बॉर्डर बंद असल्यामुळे माल बाहेर जाऊ शकत नाही. सोमवारपासून टोमॅटोच्या भावात सुधारणा होईल, असा अंदाज आहे. मागणीनुसार हे दर स्थिर राहतील किंवा आवक घटल्यास वाढूही शकतात. शेतकर्‍यांनी प्रतवारी करून माल आणल्यास योग्य दर मिळणे सुलभ होईल. – राजाभाऊ शेख, टोमॅटो व्यापारी

Tomato prices take a tumble; hit by export ban

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *