सातपूर च्या शिवाजी नगर भागात बिबटया जेरबंद

नाशिक: प्रतिनिधी

आज सकाळपासून सातपूरच्या शिवाजी नगर, तुकाराम गार्डन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वन विभागाने पाच ते सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर  जेरबंद करण्यात यश आले आहे. येथील एका निर्मानाधीन रो हाऊस प्रकल्पावरील मजुरांना सकाळी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर नगरसेवक अमोल पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम दाखल झाली होती. सकाळपासून बिबट्या आणि पथक यांच्यात लपाछपी चा खेळ सुरू होता. अखेर दुपारी वन विभागाने या बिबट्याला पकडण्यात यश मिळवले. यावेळी नागरिकांनी बिबट्यालापाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *