नाशिक

बेदमुथा कंपनीत बिबट्याची एन्ट्री

वन विभागाने ट्रँक्युलाइज करून घेतले ताब्यात

सिन्नर : प्रतिनिधी
मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील बेदमुथा इंडस्ट्रीजच्या आवारात बुधवारी सकाळी बिबट्या आढळल्याने कंपनी परिसरात काही काळ घबराट पसरली. बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. बचाव पथकाने बिबट्याला ट्रँक्युलाइज करून सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पकडलेली बिबट मादी असून, तिचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे.
बुधवारी (दि. 12) सकाळी साडेदहाच्या सुमारास कंपनीच्या आवारात बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक आकाश रुपवते, वनरक्षक संतोष चव्हाण तसेच वन्यजीव बचाव पथकाचे मधुकर शिंदे, रोहित लोणारे आणि निखिल वैद्य घटनास्थळी पोहोचले.
वन विभागाच्या पथकाने कंपनी कर्मचार्‍यांच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला. योग्य खबरदारी घेत वन्यजीव बचाव पथकाने बिबट्याला ट्रँक्युलाइज केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वनोद्यानात नेण्यात आले. या कारवाईदरम्यान बेदमुथा कंपनीचे महेश सूर्यवंशी आणि एकनाथ हारक यांनी वन विभागाच्या पथकाला सहकार्य केले.

Leopard enters Bedmutha company

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago