नाशिक

जि. प. च्या 9 कर्मचार्‍यांना दणका

एक दिवसाचे वेतन कपातीचे सीईओंकडून निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काल जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागास अचानक भेट देऊन विभागीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती, दैनंदिन कामकाज तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांशी संबंधित कामांचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान नऊ कर्मचारी यांनी कार्यालयीन उपस्थितीची हजेरी नोंदविलेली नसल्याचे निदर्शनास आले. कार्यालयीन शिस्त, वेळेचे पालन आणि प्रशासकीय कामकाजातील जबाबदारी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत संबंधित नऊ कर्मचार्‍यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे
निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांनी दिले. शासकीय कार्यालयातील उपस्थिती व वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींची सुरक्षितता, वर्गखोल्यांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्तीची कामे, प्रस्तावित बांधकामे तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून घेतली.
शाळा इमारतींची दुरुस्ती व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घ्यावी, असे निर्देश पवार यांनी दिले. ज्या शाळांमध्ये इमारती किंवा वर्गखोल्यांची स्थिती धोकादायक आहे अशा ठिकाणी तातडीने आवश्यक कार्यवाही करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळी आढावा, संध्याकाळी पदोन्नती

शिक्षण विभागातील प्रतीक्षा यादीतील आठ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काल सकाळी दिल्या. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून कालच सायंकाळी या 8 शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिली.

Z. P. 9 employees hit

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago