वन विभाग अॅक्शन घेणार कधी?
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या वस्तीवर रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून वासरावर हल्ला केला. त्याच ठिकाणी बिबट्याने वासराचा फडशा पाडला. वनविभागाने सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
दिंडोरी तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात वनारवाडी येथे तरुणीवर हल्ला करून ठार केले, तर दिंडोरीत जाधव वस्तीवर चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतला. वन विभागाने तालुक्यातील ज्या गावांमध्ये बिबट्याचे प्रमाण अधिक आहे, अशा गावांमध्ये जाऊन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. हल्ला झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी यांना फोनवर जणू आमंत्रण द्यावे लागते, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांमध्ये बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे,
अशा गावांसाठी पिंजर्यांची संख्या वाढवून त्या गावांमध्ये पिंजरे लावावे किंवा त्या गावांसाठी पिंजरे राखीव ठेवावे. मात्र सध्या वनविभाग गाफील असल्याचे चित्र आहे. असे किती बळी बिबट्याने घेतल्यानंतर वनविभाग अॅक्शन मोडवर येणार, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…