विंचूर/निफाड : विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले आहे. परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून, नांदगावमधील विजय एकनाथ जाधव यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीमध्ये बुधवारी सकाळी बिबट्या पडल्याचे लक्षात आले.
जाधव यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने नांदगाव येथे दाखल झाले. विहिरीत पडलेल्या पाचवर्षीय बिबट्यास सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पिंजर्याद्वारे निफाड येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास अधिवासात सोडण्यात आले. बिबट्या रेस्क्यूसाठी येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल जयराम शिरसाट, वनपाल विजय दोंदे, वनविभागाच्या आधुनिक पथकातील भारत माळी, शरद चांदोरे, ज्ञानेश्वर पवार, काशीनाथ माळी, आसिफ पटेल आदींनी परिश्रम घेतले.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…