उसाच्या बांधालगतच जि. प. शाळा; 36 विद्यार्थी, एकच शिक्षिका
लासलगाव : वार्ताहर
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील जगदाळे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागून असलेल्या दाट उसाच्या शेतात गुरुवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेच्या अगदी बांधालगतच उसाचे शेत असून, त्यात बिबट्या दिसल्याने अवघ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत तातडीने पुरुष शिक्षकाची नियुक्ती करावी आणि वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जगदाळे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे 36 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी सध्या केवळ एकच महिला शिक्षिका कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी शाळा सुरू होत असतानाच शेजारील उसाच्या शेतात बिबट्या मुक्तपणे वावरताना ग्रामस्थ आणि काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेच्या चारही बाजूंना ऊस आणि झाडी असल्याने वन्यप्राण्यांचा धोका कायम असतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि अध्यापनाची जबाबदारी पार पाडणे हे सर्व काम एकट्या महिला शिक्षिकेला करावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत किमान एक पुरुष शिक्षक असणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना न केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव मुलांना शाळेत न पाठवण्याचा इशारा ग्रामस्थांनी
दिला आहे.
पालकांमध्येही चिंता
पालकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली असून, मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच शिक्षण विभागाने अतिरिक्त पुरुष शिक्षकाची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Leopard sightings raise concerns about student safety.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…