मनपासमोर घोषणाबाजी : काही काळ तणावाचे वातावरण
मालेगाव : प्रतिनिधी
संगमेश्वर आणि कलेक्टरपट्टा बचाव कृती समिती तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी 19 एकर जमीन गट क्रमांक 53 व 54 या जमीन प्रकरणी भूमाफियांच्या निषेधार्थ मालेगाव शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. श्रीराम मंदिर, श्री रामसेतू पूल येथून सुरू झालेला मोर्चा मालेगाव महानगरपालिका मुख्य कार्यालयावर धडकला.
संबंधित 19 एकर जमिनीवरील 2006 पूर्वीचे क्रीडांगण, महिला रुग्णालय, शाळा आदी सार्वजनिक आरक्षण कायम ठेवून जमीन शासन जमा करावी तसेच संबंधित जमीन व्यवहार रद्द करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संगमेश्वर परिसरातील सुमारे 19 एकर जमिनीवर 2006 पूर्वी क्रीडांगण, महिला रुग्णालय, शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षण होते. हे आरक्षण कायम ठेवत संबंधित जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा ठाकूर, शुभांगी शिंदे (किन्नर) यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि युवक सहभागी झाले होते. महापालिका कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला. दरम्यान, काही आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला व जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आयुक्त दालनात बैठक
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महापालिका आयुक्त आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये आयुक्त दालनात बैठक झाली. बैठकीत आंदोलकांनी संबंधित 19 एकर जमीन शासन जमा करणे, 2006 पूर्वीचे सार्वजनिक आरक्षण कायम ठेवणे आणि जमीन व्यवहार रद्द करणे, या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Public protest march in Malegaon against land mafias.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…