कोठुरे : कोठुरे परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील उपसा जलसिंचन सोसायटीचे चेअरमन सुयोग गिते यांच्या घराजवळ 15 मे रोजी रात्री आठच्या सुमारास दोन बिबटे फिरत असल्याचे दिसून आलेे. सध्या शेतकरी वर्गाचे कांदा काढणीचे काम सुरू आहे. मजूर शेतात येण्यास टाळाटाळ करीत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाचा कहर आणि वारंवार बिबट्याचे दर्शन आदींमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोठुरेे व गोदाकाठ परिसरात बर्याच दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार आहे. कुत्रा, बकरी, वासरे, हे बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडत असताना, आता मनुष्यावरही बिबट्याचे हल्ले सुरू झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
सिडको : दिलीपराज सोनार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारु दुकानाबाहेर…
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…