नाशिक

बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा

मनमाड ः प्र्रतिनिधी
चार दिवसांपूर्वीच एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते, तोच एक दिवस गॅप देऊन दुसरा बिबट्या आल्याची चर्चा परवा रात्री होती आणि काल रात्री पुन्हा एकदा बिबट्या मनमाड शहरातील गुरुद्वारामागील शीख मळ्यात घुसल्याचे अनेक नागरिकांनी बघितले.
सुरुवातीला ही अफवा आहे असेच वाटत होते, मात्र अनेकांनी त्याला बघितले आणि काहींनी तर फोटोदेखील काढले. यामुळे बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट शीख मळा आहे की काय, असेच म्हणण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे. रात्री गुरुद्वारामधील सेवेदार वनविभाग कर्मचारी पोलीस मनमाड शहरातील नागरिक यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या कुठेही आढळून आला नाही. आता पुन्हा पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
बिबट्या आला, बिबट्या आला ही केवळ अफवा ठरत होती; मात्र मागील आठवड्याभरात शहरात दोनदा बिबट्याने दर्शन दिले आहे. एक जेरबंद करण्यात आला असूनही दुसरा बिबट्यादेखील आता पुन्हा एकदा शीख मळ्यात गेला आहे. याचे अनेक साक्षीदार आहेत. त्याला शोधण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात आले.
मात्र, बिबट्या काही आढळून आला नाही. आता या बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा पिंजरा लावण्यात आला असून, हा बिबट्या जेरबंद व्हावा, अशी सर्वसामान्य मनमाडकर जनतेची मागणी आहे. शहरातील आययुडीपी या भागात हा बिबट्या फिरत असून, यामुळे या परिसरात राहणारे नागरिक भीतीमध्ये आहे. या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा, अशी मागणी आता मनमाड शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago