आजचे युग हे ‘लाइक, शेअर आणि कमेंट’चे आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजची तरुण, प्रौढ आणि थोडीफार वयस्क मंडळी दिवसातील किमान एक तास तरी घालवत आहेत. आवडलेल्या पोस्टला, व्हिडीओला किंवा रीलला लाइक करणे, शेअर करणे अथवा कमेंट करणे, हे नित्याचे झाले आहे. अभिव्यक्तीचा हा बदलता फॉर्म आता सर्वांच्या अंगवळणी पडू लागला आहे.
मनापासून आवडलेली पोस्ट असेल तर लाइक करणे सहज होते. मात्र, न आवडलेल्या गोष्टीलाही लाइक करून पोस्ट टाकणार्याची मर्जी राखावी लागते. पूर्वी पारावर बसून लोक समोरासमोर गप्पा मारायचे. मनातील विचार मोकळेपणाने मांडायचे. एखादी कथा किंवा कल्पना सर्वांना सांगायचे. घडलेला प्रसंग कथन करायचे. आपले मत मनापासून व्यक्त करून समोरच्या सगळ्यांवर प्रभाव टाकायचे. बोलण्यातून आणि हावभावातून त्या व्यक्तीचा खरेपणा समजायचा. आज मात्र सगळे काही नाटकी झाले आहे. तीस सेकंदाचा स्वतःचा रील बनवून अनेक जण लोकांना सहज वेड्यात काढतात. तंत्रज्ञानाचा वापर करून रिटेक घेऊन तयार केलेला व्हिडीओ पाहणार्याचे मन सहज बदलवू शकतो. प्रत्यक्ष भेटींपासून खलिता, घोडेस्वार, कबुतर, पत्र, फोन, मोबाइल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशी साधने वापरत माणूस वेगाने बदलत चालला आहे.आता लोक एकमेकांशी ऑनलाइन भांडतात. फेसबुक व इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या कुळाचा उद्धार करतात. अंगावरचे कपडे काढून डोक्याला गुंडाळून लोक एकमेकांवर जहरी कमेंट्स करतात. व्हॉट्सअॅपवर झालेली भांडणे प्रत्यक्ष मैदानात उतरतात आणि दंगली भडकतात. एखाद्या पोस्टवर टाकलेल्या कमेंटवर पुन्हा कमेंट्स येतात आणि त्यातून एकमेकांना ’पाहून घेऊ’ अशी भाषा वापरली जाते. जात, धर्म, वंश, भाषा, राजकीय विचारसरणी या सगळ्या विषयांवर लोक तावातावाने, अतार्किक पद्धतीने व्यक्त होतात. एखाद्याचे मनोबल खच्ची करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या सोशल मीडियाच्या वॉलवर नको त्या शब्दांत कमेंट करणे, हे आजचे प्रभावी अस्त्र बनले आहे. मॉर्फ करून तयार केलेले व्हिडीओ समाजात अशांतता निर्माण करू शकतात. एआयचा वापर करून बनवलेले व्हिडीओ एखाद्याला आयुष्यातूनच उठवू शकतात. लाइक, कमेंट आणि शेअर यांच्या माध्यमातून समाजात आनंद, प्रेम, शांतता आणि भाईचारा पसरवायचा की, अशांतता, हे आता समाजाच्या हातात आहे. 1990 च्या दशकात जन्माला आलेल्या अनेकांच्या डोळ्यांसमोर जन्मानंतर लगेचच कॉम्प्युटरचा स्क्रीन आणि इंटरनेट आले. ही पिढी आज 25 ते 30 वर्षांची असून, करिअर आणि सोशल मीडियात गुंतलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ आलेली 15 ते 25 वयोगटातील तरुण पिढी ज्या अनुभवांतून जगते, त्यांचा गंधही 45 ते 70 वयोगटातील जुन्या पिढीला नाही. त्यामुळे या ‘जेन- झी’ पिढीला समजून घेणे आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या नव्या ट्रेंडला योग्य दिशा देणे, हेच वयस्कर पिढीसमोरील खरे आव्हान आहे. तंत्रज्ञान थांबणार नाही. बदलही थांबणार नाही. मात्र, ‘लाइक, शेअर आणि कमेंट’ या छोट्याशा कृतीमागे असलेली जबाबदारी प्रत्येकाने ओळखली, तर हाच सोशल मीडिया समाजजोडीचा मजबूत पूल ठरू शकतो.
Like, share and comment.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…