नाशिक

शनिशिंगणापूरजवळ अपघात; इगतपुरीचे तिघे ठार

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावातून दि. 3 रोजी शिर्डी येथे साई पालखी गेली होती. पालखीतील पाच तरुण रिक्षाने दि. 6 रोजी दुपारी शिर्डी येथून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असताना इगतपुरीच्या तरुणांच्या रिक्षाला राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इगतपुरी शहरातील तीन तरुण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेेत.
इगतपुरी येथील साई पालखीत गेलेल्या भाविकांनी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात दर्शन घेत पुन्हा इगतपुरीच्या परतीचा प्रवास सुखरूपपणे केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे पाच तरुण अ‍ॅपेरिक्षा (एमएच 15-1131) इगतपुरीहून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डीहून शनिशिंगणापूरकडे देवदर्शनाला जात असताना शनिशिंगणापूर मार्गावरील उंबरे पिंपरी परिसरात तांबे पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी, दि. 6 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शनिशिंगणापूरहून दर्शन करून शिर्डीकडे परतणार्‍या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलरची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात तीन तरुण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. या धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, अ‍ॅपेरिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. रिक्षामधील दीपक जगन डावखर (वय 22), आकाश गंगाधर डावखर (22) आणि दीप विजय जाधव (22, सर्व रा. गिरणारे, इगतपुरी) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रूपेश गणेश भगत (19), रोशन गंगाधर डावखर (वय 24, रा. गिरणारे) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये सुमारे 20 ते 22 साई शनिभक्त प्रवास करत होते. धडकेनंतर वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले. यात दहा ते बारा भाविक जखमी झाले. जखमींवर विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिक मदतीला धावले. या घटनेनंतर एकच गोंधळ व आरडाओरड झाली. परिसरातील नागरिक आणि इतर वाहनातील प्रवाशांनी ट्रॅव्हल्स बसमधील महिला पुरुष व लहान मुलांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढले.
गावात शोककळा पसरली
या अपघाती घटनेची माहिती इगतपुरीत कळताच गिरणारे गावात ओरडाओरड सुरू झाली. डावखर व जाधव कुटुंबाला या घटनेबद्दल रात्री उशिरा माहिती मिळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांची धावपळ सुरू होती.
काही नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले, तर अनेक नातेवाइकांना पहाटे घटना समजली. या घटनेमुळे गिरणारे गावात शोककळा पसरली. दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता तिघा तरुणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शहर व परिसरातील लोकांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली.

Accident near Shani Shingnapur; Three from Igatpuri killed

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago