देवळा तालुक्यातील खामखेडा येथील घटना
देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील खामखेडा येथे सोमवारी (दि. 9) सकाळी अंगणात खेळत असलेल्या दोनवर्षीय बालिकेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. देवांशी आकाश सोज्वळ असे बालिकेचे नाव आहे.
खामखेडा येथील कोळीवाडा वस्तीतील भाऊसाहेब महादू सोज्वळ यांची नात व आकाश सोज्वळ यांची कन्या देवांशी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अंगणात खेळत होती. आई घरकामात व्यस्त होती, ती कधी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेली हे समजले नाही. थोड्याच वेळात मुलीचा आवाज न आल्याने आईने शोध घेतला.
देवांशी घराजवळच्या पाण्याच्या टाकीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. तातडीने तिला खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले. दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…