LOAD SHEDDING

महाराष्ट्रातील जनतेवर

भारनियमनाचे संकट 

मुंबई : सुमारे दहा वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनतेवर भारनियमनाचे संकट आले आहे. 

महावितरणने भारनियमन लागू होत असल्याची घोषणा केली आहे. देशभरात विजेची मागणी वाढली असून, अनेक राज्यांमध्ये जनतेलाभारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.  

 

महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुर्‍या वीज निर्मितीमुळे सुमारे 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे.

 

फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटा येत असून, औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल 4000 मेगावॅटने वाढ झालेली आहे. महावितरणची विजेची मागणी तब्बल 24500 ते 24800 मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख पाहता, ही मागणी 25500 मेगावॅटवर लवकरच जाण्याची शक्यता आहे. रात्री कालावधीत देखील 225000 ते 23000 मेगावॅट विजेची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *